Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीSubhash Ghai : दिग्दर्शक सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल

Subhash Ghai : दिग्दर्शक सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई :  बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांना तब्येतीच्या कारणास्तव मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ७९ वर्षीय सुभाष घई यांना काल अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसंच अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याने त्यांमा तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे. दिग्दर्शकाची तब्येत बिघडल्याची बातमी येताच सोशल मीडियावरील त्यांचे सर्व चाहते काळजीत पडले.

मिळालेल्या माहितीनुसार सुभाष घई यांना काल रात्री लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. न्यूरोलॉजिस्ट डॉ विजय चौधरी, हृदय रोग विशेषज्ञ डॉ नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ जलील पारकरससह इतर टीम यांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत. श्वासासंबंधी तक्रारी, अशक्तपणा, सतत चक्कर येणे, स्मृती कमी होत जाणे आणि बोलताना अडचण येणे अशा अनेक समस्या त्यांना जाणवू लागल्या. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत. दोन दिवसांनी त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचीही शक्यता आहे.

Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

घई यांच्या निकटवर्तियाने स्पष्ट करत सांगितले की, “आम्ही सांगू इच्छितो की सुभाष घई आता स्वस्थ आहेत. त्यांना नियमित उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आणि आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि काळजीसाठी धन्यवाद.”

सुभाष घई यांनी ‘कालीचरण’, ‘कर्ज’, ‘हिरो’, ‘विधाता’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘परदेस’ आणि ‘ताल’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. ते ७९ वर्षांचे आहेत. नव्वदच्या दशकात ते लोकप्रिय दिग्दर्शक होते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास १६ चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यांच्या काही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. ते ‘ऐतराज २’ आणि ‘खलनायक २’ या दोन चित्रपटांवर सध्या काम करत आहेत. हे दोन्ही सीक्वेल बनवण्याबद्दल त्यांनी त्यांचे विचार मांडले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -