
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील (Pune Station) प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आला (Pune Station Bomb Threat) होता. सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे वय ४० असून तो पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune News)

कॅलिफॉर्निया : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा २’ (Pushpa 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) नवनवीन रेकॉर्ड्स ...
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीने फोन केला. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तपासणी केली. मात्र त्याठिकाणी तसे काही आढळून आले नाही.
फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढल्यावर तो पिंपरी - चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याचे समजले. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.