Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

८ डिसेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष फेस्टिवल गाडी

८ डिसेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष फेस्टिवल गाडी

रत्नागिरी: अहमदाबाद ते थिवी या मार्गावर कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल गाडी येत्या ८ डिसेंबरपासून २ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे. ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. आठवड्यातून दोनदा ही गाडी धावणार आहे. अहमदाबाद येथून ही गाडी (क्र. 09412) रविवार तसेच बुधवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि गोव्यात थिवी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. 09411) थिवी येथून सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी कोकणात पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबेल. गाडीला एकूण १५ एलएचबी डबे असतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >