
गोंदिया : मोबाईलचा गैरवापर ,मोबाईल जास्त प्रमाणात वापरणे हि तक्रार वारंवार पालकांकडून येत असते. लहान मुले खेळाला कमी आणि मोबाईलला जास्त प्राधान्य देतात अशी तक्रार पालक शिक्षकांकडे करतात. मात्र गोंदिया जिल्ह्यात मोबाईलच्या स्फोटात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत रस्ते अपघातांबाबत धक्कादायक माहिती सांगितली. वर्षभरात देशामध्ये १ ...
खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्यानं त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध इथं सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. सुरेश संग्रामे (वय ५५) असं मृतक शिक्षकाचं नाव आहे. तर नत्थु गायकवाड (५६) असं गंभीर जखमी असलेल्या इसमाचं नाव आहे.
मृतक सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी नत्थु गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगावटोला येथील रहिवासी आहेत. दोघेही नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडं निघाले असताना ही घटना घडली. गंभीर जखमी नत्थु गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.