सात जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी
कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये भीषण अपघात (UP Accident) घडल्याची बातमी समोर आली आहे. लखनौ आग्रा एक्स्प्रेस वेवर एका खासगी बसची टँकरला जोरदार धडक झाली. या धडकेत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये लखनौ आग्रा एक्स्प्रेस वेवर आग्र्याला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली खासगी बसची पाण्याने भरलेल्या टँकरला जोरदार धडक दिली. या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यांनी सांगितल्यानुसार, पाण्याने भरलेला टँकर झाडांना पाणी देण्यासाठी चुकीच्या बाजूने जात असताना हा अपघात झाला.
दरम्यान, खासगी बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होत. यातील सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सैफई वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. (UP Accident)