
पुणे : विमानतळावर प्रवाशांना बॅग चेकींग करणे महत्त्वाचे असते. पूर्वी बॅग तपासणीसाठी प्रवाशांना बराच काळ रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांचा त्रास पाहता पुणे विमानतळ प्रशासनाने (Pune Airport) नवी सुविधा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना विमानतळावर आता बॅग तपासणीसाठी तासभर उभे राहावे लागणार नाही.
/>
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांचे बॅग्स तपासणी वेगात व्हावी, याकरिता अत्याधुनिक दोन सीटीएक्स मशिन बसवण्यात आल्या आहेत. या मशीन एका तासात अकराशे ते बाराशे बॅगांची तपासणी करू शकतात. त्यामुळे बॅग्स तपासणीसाठी होत असलेले प्रवाशांचे वेटिंग आता संपले आहे.
या दोन अत्याधुनिक मशिनद्वारे बॅगांची एक्सरेप्रमाणे तपासणी होत आहे. बॅगांच्या आरपार दिसल्यामुळे बॅगांमध्ये काय आहे. याची माहिती सुरक्षा जवानांना लगेचच मिळत आहे. यामुळे विमानतळाची सुरक्षाही आता हायटेक झाली आहे.