Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडी“किमान पवारांनी तरी दिशाभूल करू नये”- मुख्यमंत्री

“किमान पवारांनी तरी दिशाभूल करू नये”- मुख्यमंत्री

ईव्हीएम संदर्भातील शरद पवारांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी दिले ट्विटरवर प्रत्युत्तर

मुंबई : महायुतीला मिळालेली भरघोस मते आणि ईव्हीएम संदर्भात शरद पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलेय. याबाबत ट्विटरवर संदेश जारी करत किमान पवारांनी तरी जनतेची दिशाभूल करू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतांवर विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शरद पवार यांनीदेखील महायुतीला मिळालेल्या मतांबाबत शंका उपस्थित केली होती.

शरद पवार म्हणाले होते की, मोठ्या राज्यांमध्ये भाजप आणि छोट्या राज्यांमध्ये आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटते. अजित दादा गटाची मत ५८ लाख मत असून त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले. काँग्रेसला ८० लाख मत असताना त्यांचे १५ जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले होते. महायुतीतील पक्षांना कमी मतं मिळून त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीतील पक्षांना जास्त मत मिळून कमी जागा निवडून आल्या, याकडे पवारांनी लक्ष वेधले होते. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर (एक्स) उत्तर दिले आहे.

Ajit Pawar : ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे – अजित पवार

जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? याबाबत सांगताना फडणवीसांनी गणित मांडले. २०२४ लोकसभेत भाजपाला १,४९,१३,९१४ मते मिळाली आणि जागा फक्त ९ मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला ९६,४१,८५६ मते आणि १३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मते आणि ८ जागा होत्या.

यापूर्वीचे २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मते होती आणि जागा ४ आल्याचे गणित फडणवीसांनी मांडले. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस म्हणाले. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे आवाहन फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांना केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -