पुणे : खराडी परिसरातील तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्कूल बसला आग लागली. यावेळी बस मध्ये १५ ते २० विद्यार्थी होते.त्यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. यानंतर बस ने पूर्ण पेट घेतला.महापालिका अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. फोनिक्स वर्ल्ड स्कूलची ही बस होती. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
PM Narendra Modi : जय भीम… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहिली श्रध्दांजली
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे निर्माते आणि सामाजिक ...
खराडी येथील फिनिक्स वर्ल्ड शाळेची बस दुपारी महावितरण कार्यालयाच्या परिसरातून निघाली होती. या बसमधून १५ विद्यार्थी प्रवास करीत होते. रस्त्यात बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात येताच चालकाने बसमधील विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. माधव राठोड असे या बसचालकाचे नाव आहे. त्यांनी प्रसंगावधान राखले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता. चालक राठोड यांनी बसवर वेळीच ताबा मिळविल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.