Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Pandharpur : पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या पुन्हा हालचाली

Pandharpur : पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या पुन्हा हालचाली

सोलापूर : देशभरातून लाखोंच्या संख्येने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या पुन्हा हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री व भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांनी विधीमंडळ गटनेता निवडीप्रसंगी तसे सुतोवाचही केले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याच्या हाचचाली वेगाने सुरु केल्या आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने आल्यानंतर आता अनेक वर्षापासूनची वारकऱ्यांची काॅरिडाॅरची मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेचे वारकरी संप्रदायामधून स्वागत ही केले जात आहे. आषाढी, कार्तिकीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते, यावेळी लाखो भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होते. अन्य वेळीही दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी असते. विठ्ठल दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, विनात्रास विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दी नियंत्रित करता यावी यासाठी राज्य सरकारने मंदिर परिसरात काॅरिडाॅर तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे, मध्यंतरी यावरती काम देखील सुरु झाले होते. परंतु, स्थानिक दुकानदारांनी याला विरोध केला आहे. त्यानंतर काॅरिडाॅरची चर्चा थांबली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >