
कल्याण : गेली काही वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला एकविरा गडावरील (Ekvira Devi Fort) `एक दिवस कायस्थांचा' उत्सव रविवारी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. या उत्सवासाठी राज्य व देशातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे विचार आणि भारतीय संविधानाला (Constitution) आदर्श मानून शासनाचा कारभार सुरू आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, ...
गेली ८-९ वर्षे `एक दिवस कायस्थांचा' एकविरा गडावर साजरा केला जातो. दरवर्षी उत्सवाची चढती कमान असते. यावर्षीही एक दिवस कायस्थांच्या सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा (Ekvira Devi) होम करण्यात येणार असून या होमासाठी ज्ञातीतील जोडप्यांचा सहभाग असणार आहे. शिवाय महाआरती, पालखी, स्मरणिका प्रकाशन, भजन-किर्तन, भारुड इत्यांदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी होणारा कार्यक्रम एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वप्नपूर्ती बंगला परिसरात करण्यात येणार आहे. कार्यक्रमास ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावर्षीचा कार्यक्रम सीकेपी समाजातील चार संस्था एकत्र येवून करीत आहेत. सीकेपी संस्था, कायस्थ प्रभू उत्कर्ष संस्था, पुणे सीकेपी फॅमेली ट्रस्ट, धर्मवीर आनंद दिघे विचार मंच इत्यादी संस्थांचा पुढाकार आहे. `एक दिवस कायस्थांच्या कार्यक्रमाला कायमस्वरुपी भव्य स्वरुप यावे म्हणून देवीच्या नावाने विश्वस्त संस्था स्थापन करुन आगामी वर्षापासून उत्सव सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सीकेपी ज्ञातीतील विविध संस्थांतर्फे विकास देशमुख, स्वप्निल प्रधान, मिलिंद मथुरे, जयदिप कोरडे, निलेश गुप्ते, तुषार राजे आदींनी केले आहे. (Ekvira Devi Fort)