Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीRajya Sabha: राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या आसनावर सापडले पैसे

Rajya Sabha: राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या आसनावर सापडले पैसे

अभिषेक मनु सिंगवींच्या सीटवर नोटांचे बंडल आढळले

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभा सभागृहात २२२ क्रमांकाच्या आसनावर चलनी नोटांचे बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंगवी यांचे आहे. त्यांच्या जागेवर नोटांचे बंडल आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

यासंदर्भात सभागृहाला माहिती देताना राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, गुरुवारी (५ डिसेंबर रोजी) सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर सभागृहाची तपासणी सुरू असताना आसन क्रमांक २२२ वर चलनी नोटांचे एक बंडल आढळून आले. हे आसन काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आले आहे. नोटांचे बंड आढळल्याचे समजताच यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले. धनखड याबाबत सभागृहाला देत असताना काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदाराचे नाव घेऊ नये असा ग्राहक केला. दरम्यान अभिषेक मनू सिंघवी यांनी सदर बंडल आपले नसल्याचे सांगितले. मी राज्यसभेत जाताना फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन जातो. मी पहिल्यांदाच याबद्दल ऐकले. मी दुपारी १२.५७ वाजता सभागृहात पोहोचलो आणि दुपारी 1 वाजता सभागृह तहकूब झाले. त्यानंतर, मी दुपारी १.३० पर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो. अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासमवेत आणि संसदेतून बाहेर पडलो असे त्यांनी सांगितले. सिंघवी यांनी या घटनेच्या चौकशीचे स्वागत केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -