मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना आजपासून अॅडलेडच्या मैदानावर सुरू झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पिंक बॉल कसोटीत टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव केवळ १८० धावांवर आटोपला. नितीश रेड्डी ४२ धावांसह टॉप स्कोरर राहिला. तर मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६ विकेट मिळवल्या. २ स्कॉट बोलँड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.
ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला १३ धावांवर बाद केले. बुमराहची या वर्षातील ५०वी विकेट आहे. या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे. बुमराहशिविय इतर कोणत्याही गोलंदाजाने या वर्षी ५० कसोटी विकेट घेत हा इतिहास रचलेला नाही.
खास बाब म्हणजे आज जसप्रीत बुमराहचा(Jasprit Bumrah )वाढदिवस आहे. तो ३१ वर्षांचा झाला आहे.तसेच तो एका स्पेशल क्लबमध्येही सामील झाला आहे. कपिल देव आणि झहीर खान यात आहेत. बुमराह वगळता झहीर खानने २००२मध्ये ५१ कसोटी विकेट घेतल्या होत्या.