Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

PM Narendra Modi : जय भीम… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहिली श्रध्दांजली

PM Narendra Modi : जय भीम… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहिली श्रध्दांजली
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रध्दांजली वाहिली. त्यांनी समाज माध्यम, एक्सवर याविषयीचे एक ट्वीट केले आहे. मोदींनी भाररत्न बाबासाहेब आंबडेकर यांना नमन करत असल्याचे म्हटले. समानता आणि मानवी मूल्य जपण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मोदी म्हणाले.



 पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा आम्ही त्यांच्या योगदानाची आठवण करतो, तेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा सुद्धा पुनरुच्चार करतो. जय भीम! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये यावर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील चैत्यभूमीला भेट दिल्यानंतरचा फोटो शेअर केला.
Comments
Add Comment