Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune News : 'मी नथुराम गोडसे बोलतोय’ आता हिंदी भाषेत; पुण्यात रंगणार विशेष प्रयोग!

Pune News : 'मी नथुराम गोडसे बोलतोय’ आता हिंदी भाषेत; पुण्यात रंगणार विशेष प्रयोग!

पुणे : मराठी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Me Naturam Godse Boltoy) हे नाटक आता हिंदी रंगभूंमीवर नाट्यरसिकांच्या (Theater Lovers) मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकावर या हिंदी नाटकाचे (Hindi Drama) रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे आता अमराठी प्रेक्षकांना महात्मा गांधींच्या मृत्यूमागचं कारण, नथुराम गोडसे व्यक्ती म्हणून नक्की कशी होती? हे या नाटकामुळे पाहता येणार आहे. तसेच पुणे शहरात या नाटकाचे विशेष प्रयोग ठेवण्यात येणार आहेत.



पेंटर प्रस्तुत आणि भरत दाभोळकर लिखित दिग्दर्शित ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाचे दोन विशेष प्रयोग रविवार १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ३ मिनिटं आणि सायंकाळी ५ वाजून ३० मिनिट वाजता पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात हे नाटक रंगणार आहे.


दरम्यान, या नाटकात नथुराम गोडसे यांची भूमिका अभिनेता विकास पाटील तर महात्मा गांधी यांची भूमिका अनंत महादेवन यांनी साकारली आहे. या दोघांसोबत भरत दाभोळकर, मोहन आझाद, कौस्तुभ सावरकर, संदीप जंगम, मंगेश देसाई आणि डॉ. दीपा भाजेकर यांनी या नाटकात भूमिका केल्या आहेत. आयडियाज एंटरटेनमेंटच्या ‘नथुराम गोडसे को मरना होगा’ या हिंदी नाटकाच्या निर्मितीची धुरा सेजल दिपक पेंटर यांनी सांभाळली आहे.

Comments
Add Comment