Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीआसाम, मेघालय फिरण्याची संधी, कमी बजेटमध्ये IRCTCने आणलेय पॅकेज

आसाम, मेघालय फिरण्याची संधी, कमी बजेटमध्ये IRCTCने आणलेय पॅकेज

मुंबई: वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. याच महिन्यात ख्रिसमसचा(christmas) सणही साजरा केला जातो. तर ख्रिसमस संपताच नवे वर्ष सेलिब्रेट करण्याची संधी येते. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात जी काही धावपळ, मेहनत केली जाते त्याचा थकवा घालवण्यासाठी डिसेंबर चांगली संधी आहे.डिसेंबरच्या महिन्यात थंडीही असते. यादरम्यान अनेक जण बाहेर फिरायला जातात.

अनेकजण भारतातील विविध सुंदर ठिकाणी फिरायला जातात. यात नॉर्थ ईस्टच्या राज्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास आसाम आणि मेघालय फिरण्यासाठी अनेक लोक जातात. आसामचे काझीरंगा पार्क आणि कामाख्या माता मंदिर येथे खूप गर्दी असते. जर तुम्हालाही येथे फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने शानदार पॅकेज आणले आहे.

IRCTC आसाम-मेघालय टूर पॅकेज

IRCTC अनेकदा प्रवाशांच्या सोयीसाठी देश-परदेशातील सुंदर शहरे फिरण्यासाठी शानदार टूर पॅकेज घेऊन येते. यावेळेस आयआरसीटीसीने Wonders of Assam & Meghalaya Ex Bengaluru हे पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला आसाम आणि मेघालयची सुंदरता पाहायला मिळेल. IRCTCच्या टूरम्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी, मावलिनोंग, काझीरंगा आणि गुवाहाटी ही शहरे फिरण्यासाठी मिळतील. हे पॅकेट फ्लाईट टूर पॅकेज असेल. हे ५ दिवस आणि ६ रात्रीचे पॅकेज असेल. यात तुम्हाला फिरण्यासाठी एसी बसची सुविधा मिळेल. सोबतच एक टूर गाईडही असेल.

द्यावे लागतील इतके पैसे

IRCTCच्या या आसाम आणि मेघालय टूरला १६ डिसेंबर २०२४ आणि २९ जानेवारी २०२५ या दोन तारखांना सुरूवात होईल. ज्या तारखेला तुम्हाला जायचे आहे तुम्ही बुकिंग करू शकता. एकट्याला या टूरवर जायचे असेल तर ४९५०० रूपये द्यावे लागतील. तर दोन लोक एकत्र या टूरवर जात असतील तर प्रति व्यक्ती ४२,५०० रूपये असतील. जर तीन लोक एकत्र जात असतील तर प्रती व्यक्ती ४०,७०० रूपये होतील. सोबतच ५ वर्षे ते ११ वर्षापर्यंतच्या मुलासाठी बेडसह ३५९९० रूपये तर बेडीशिवाय ३२९९० रूपये द्यावे लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -