
पैसे
अनेकांना फ्रीजच्या वर पैसे ठेवण्याची सवय असते. मात्र वास्तुच्या हिशेबाने फ्रीजच्या वर पैसे ठेवू नयेत. यामुळे धन हानी होण्याची शक्यता असते.
धातूच्या वस्तू
काही लोकांना सवय असते की फ्रीजच्या वर धातूच्या वस्तू अथवा ट्रॉफी ठेवतात. मात्र असे मुळीच करू नये. असे करणेही वास्तुशास्त्राच्या हिशेबाने चुकीचे आहे.
सजावटीच्या वस्तू
काही जण फ्रीजला सजवण्यासाठी त्याच्यावर फुलांचा गुच्छ अथवा फुलदाणी ठेवतात. मात्र असे करू नये फुलांचा गुच्छ फ्रीजवर ठेवणे शुभ मानले जात नाही.
औषधे
अनेकदा लोक फ्रीजच्या वरती औषधे ठेवतात. मात्र कधीही फ्रीजच्या वर औषधे ठेवू नयेत.
योग्य दिशा
याशिवाय फ्रीज नेहमी किचनच्या दक्षिण-पूर्व, पश्चिम अथवा उत्तर दिशेला ठेवले पाहिजे.