Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : मी नाराज नाही, 'डेडीकेटेड टू कॉमन मॅन' झालो -...

Eknath Shinde : मी नाराज नाही, ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ झालो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मी नाराज नाही. मी माझी भूमिका आधीच जाहीर केली होती. मी सीएम होतो तेव्हा ‘कॉमन मॅन’ समजत होतो. आता डीसीएम झालो- ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ झालो आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा देईल. मेहनतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने घडेल, अशी भावना नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ दिला पाहिजे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षात ज्या प्रमाणे सहकार्य केलं, त्याप्रमाणे मी ही त्यांना पूर्ण सहकार्य करेल, अशी भूमिका शिंदे यांनी स्पष्ट केली.

शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र आहे. या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी माझ्या सारख्या शेतकऱ्याचा मुलाला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. गेल्या अडीत वर्षात देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राने राज्याला भरभरुन पाठबळ दिलं. यासाठी मी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देतो. अमित शाह यांना ही धन्यवाद देतो. कारण ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणून गेल्या अडीच वर्षाचं कार्यकाळ यशस्वी झाला. इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं. आम्ही एक टीम म्हणून काम केलं.

आम्ही ४० आमदार होतो. या निवडणुकीत आता ६० झालो. ही कामाची पोचपावती आहे. याचा अभिमान आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ही भावना ठेवून काम केलं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा देईल. लोकं म्हणायचे घटनाबाह्य सरकार आहे. पण जनतेने आमच्या सरकारवर मोहोर लावली आहे. मी नाराज होतो हे कोणी सांगितलं. मी २७ तारखेलाच भूमिका जाहीर केली होती. गावी गेलो तरी नाराज, तब्येत खराब असली तरी नाराज आहे असे म्हणता. मी कामाला महत्त्व देतो. मी काम करणारा कार्यकर्ता आहे.

बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत. विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं. त्यांनी विकासाला साथ द्यावी. श्रीकांत शिंदे यांचा उपमुख्यमत्री बनवण्याचा संबंध काय आहे. तो राज्यामध्ये नाही. चिंता करु नका. सगळं तुम्हाला कळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -