Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pigeon Feeding : पारव्यांना खाऊ देताय, सावधान! बसेल मोठा फटका

Pigeon Feeding : पारव्यांना खाऊ देताय, सावधान! बसेल मोठा फटका

महापालिका ठोठावणार ५ हजार रुपये दंड


पुणे : अनेक पक्षीप्रेमींना पक्ष्यांना खायला देणे आवडते. मात्र आता हीच आवड महागात पडण्याची मोठी शक्यता आहे. अनेक ठिकाणी पारव्यांना (कबुतर) खाद्य म्हणून पोतेच्या पोते धान्य टाकले जाते. परंतु यामुळे पारव्यांंना श्‍वसनाचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. त्यामुळे आता यापुढे अशा प्रकारे खाद्यपदार्थ, धान्य टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.



पुणे शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून पारव्यांचे प्रमाण वाढले आहे. या पारव्यांच्या पिसांमुळे आणि विष्ठेतील जंतूंमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजाराची लागण नागरिकांना होत आहे. हा रोग फुफ्फुसाशी संबंधित आहे.शहरातील चौकाचौकात, महत्त्वाच्या रस्त्यावर, नदीपात्र यासह अन्य ठिकाणी पारव्यांना खाद्य पदार्थ, धान्य टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


त्यामुळे हा सर्व प्रकार पाहता घनकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण केल्याचा ठपका ठेवून नागरिकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

Comments
Add Comment