मुंबई: सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या दरम्यान लग्नानंतर नवरा-नवरीला लग्नाचे प्रमाणपत्र बनवावे लागते. मात्र जर असे केले नाही तर?
लग्नाचे प्रमाणपत्र हे एक गरजेचे कागदपत्र आहे ज्यामुळे विवाहाला अधिकृत मान्यता मिळते. दोन व्यक्तींचे लग्न झाले असून ते वैध आहे हे लग्न प्रमाणपत्र दाखवते. लग्न प्रमाणपत्र हे कायदेशीर कागदपत्र आहे जे लग्न वैध असल्याचे दाखवते. एखादा विवाह कोर्ट, मंदिर, चर्च, मस्जिद या ठिकाणी झाल्यास या विवाहाचे प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्यांकडून दिले जाते. विवाहासंबंधी एखादा कायदेशीर वाद झाल्यास हे प्रमाणपत्र फायदेशीर ठरते.
सोबतच या प्रमाणपत्राचा उपयोग संपत्ती, धन आणि इतर कायदेशीर अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केला जातो. जर एखाद्या पती अथवा पत्नीचा मृत्यू होतो तेव्हा दोघेही कायदेशीररित्या विवाहित होते याचा पुरावा हे प्रमाणपत्र देते. यामुळे संपत्तीचा अधिकार सुरक्षित राहतो.
सोबतच पासपोर्ट अथवा व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी अथवा मुलांचे जन्म प्रमाणपत्र बनवायचे असेल अथवा विवाहाच्या नावाने सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर लग्न प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे.