ठाणे : ठाणे शहरात (Thane News) गावठी हात बॉम्बचा (Village hand bomb) साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरूणाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून १० हात बॉम्ब जप्त केले आहेत. त्याच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. हे गावठी हात बॉम्ब रान डुकरांच्या शिकारीसाठी वापरले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Don Bradman : ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांच्या टोपीचा लिलाव!
साकेत रोड परिसरात एकजण गावठी हात बॉम्ब घेऊन येत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, गुन्हे अन्वेषण शाखेच्या मध्यवर्ती शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांच्या पथकासोबत बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक होते.
या पथकाने साकेत परिसरात फिरणा-या संशयित तरूणाला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता, बॅगमध्ये १० हात बॉम्ब आढळून आले. त्याने हे हात बॉम्ब सातारा येथून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.