Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीKashmir Shawl : काश्मिरी, पश्मिना, राजस्थानी शालींना पसंती; खरेदीसाठी महिलांची गर्दी‎!

Kashmir Shawl : काश्मिरी, पश्मिना, राजस्थानी शालींना पसंती; खरेदीसाठी महिलांची गर्दी‎!

किंमत अडीचशे ते नऊशे रुपयांपर्यंत

अमरावती : थंडी पडायला सुरुवात होताच उबदार कपड्यांच्या (Warm clothes) दुकानांवर तरुणांसह महिला, पुरुषांची स्वेटर, कानटोप्या, हातमोज्यांसह शाल खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी त्यानंतर मात्र थंडी वाढणार आहे. त्यामुळे साडी, ड्रेस, जीन्सवर शाही लूक येण्यासाठी यंदा शहरात तरुणींसह महिलांकडून शालींना मागणी होत आहे. यात पश्मिना, काश्मिरी, कुल्लू, राजस्थानी, कलमकारी, काठमांडू, पॉली वुलन, रेक्झीन, प्रिंट शालीला (Shawl) पसंती मिळत आहे. २५० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत शाल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजना; मुलींना मिळणार १ लाख रुपये!

शहरातील दसरा मैदान, अंबादेवी- एकवीरा देवी परिसर, बापट चौक, मोची गल्ली, श्याम चौक, जवाहर गेट, इतवारा परिसरात उबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. ९ डिसेंबरपासून शहरात कडाक्याची थंडी पडणार आहे. यामुळे आतापासूनच अमरावतीकर स्वेटर खरेदी करताना दिसून येत आहेत. मंगळवारी श्याम चौक परिसरात तिबेटियन विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढली होती. दरम्यान, बाजारात वजनाने हलकी आणि उबदार पॉली वूलन शालीला पसंती होती. शिवाय, महिलांसह तरुणींकडून रॉयल लूकसाठी राजस्थानी आणि पश्मिना, काश्मिरी शालीला पसंती मिळत होती. सुमारे ४५० ते ९०० रुपयांना या शाल उपलब्ध आहेत.

हँड प्रिंट, ब्लॉक प्रिंट डिझाइनला पसंती उबदार कपड्यांच्या बाजारात पॉली वूलन शाल, रेक्झीन शाल, प्रिंट शाल, जॉल शाल, प्लेन, अँक्रा शालसह प्युअर वूलन शाल विविध डिझाइनमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. लोकरीपासून तयार केलेली कुल्लूची पट्ट शालही बाजारात विक्रीला आहे. हँड प्रिंट, ब्लॉक प्रिंट डिझाइन्स केलेल्या कलमकारी शालचेही आकर्षण वाढले आहे. ही शाल साडी, ड्रेस, जीन्सवर अधिक शोभून दिसते. तिबेट, काठमांडू, जगदंबा शाल ३३० ते ८५० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -