Monday, February 10, 2025
Homeक्राईमPune Crime : विद्येच्या माहेरघरात ड्रग्जची विक्री; उच्चशिक्षित तरुणांना अटक!

Pune Crime : विद्येच्या माहेरघरात ड्रग्जची विक्री; उच्चशिक्षित तरुणांना अटक!

पुणे : अमली पदार्थांची विक्री (Drug sales) करणाऱ्या तस्करांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. अशातच विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणारे हेच पुणे शहर आता ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातून अमली पदार्थ विक्रीप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरात ही अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. विशेष महत्त्वाचे ड्रग्जची विक्री करणारे हे आरोपी उच्चशिक्षित आहेत. या तिन्ही आरोपींची झडती घेतल्यावर २५१ ग्रॅम ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलिग्रॅम एल.एस. डी अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

आरोपींची माहिती

बी.ए पदवीधर अंशुल संतोष मिश्रा (२७), विमान कंपनीत नोकरी करणारा आर्श उदय व्यास (२५) तर पियुष शरद इंगळे (२२) याने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हे तिघेजण अमली पदार्थ विकत असल्याचे समोर आले आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. (Pune Crime)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -