बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी

  54

ढाका : बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भातील एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन ऍक्ट २००६ अंतर्गत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.तसेच या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी संस्कृती आणि समाजावर प्रभाव वाढला आहे. ही चिंतेची बाब आहे असा दावा याचिकाकर्ते इखलास उद्दीन भुईयाँ यांनी या याचिकेत केला आहे. बांगलादेशात हिंदुस्थानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा नियम का जारी केला जाऊ नये? अशी विचारणादेखील या याचिकेतून करण्यात आली आहे. माहिती प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालयाचे सचिव, बांगलादेश दूरसंचार नियामक आयोग आणि इतरांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.या अर्जावरील सुनावणी बांगलादेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा नजीब आणि न्यायमूर्ती सिकंदर महमुदूर रझी यांच्या खंडपीठात होण्याची शक्यता आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेत स्टार जलशा, स्टार प्लस, झी बांगला, रिपब्लिक बांगला आणि इतर सर्व भारतीय टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशी संस्कृतीला विरोध करणाऱ्या मजकुराचे अनियंत्रित प्रसारण होत असल्यामुळे त्यांचा परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. तर या वाहिन्या कोणतेही नियम न पाळता चालवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे.त्यामुळे आता या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

Comments
Add Comment

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या