
आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या क्रिकेट स्मृती चिन्हांपैकी एक
सिडनी : दिग्गज क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन (Don Bradman) अर्थात डॉन ब्रॅडमन क्रिकेट (Australian cricketer) विश्वातील एक मोठं नाव आहे. क्रिकेटच्या इतिहासात सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घालत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या बॅगी ग्रीन कॅप लिलावात विकली गेली आहे. ‘बॅगी ग्रीन कॅप’चा लिलाव ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ३ नोव्हेंबर रोजी पार पडला. या लिलाव प्रक्रियेत ही कॅप २.६३ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. भारताविरुद्धच्या १९४७-४८ च्या मालिकेत ब्रॅडमन यांनी वापरलेली टेस्ट कॅप २.१४ कोटी मध्ये विकली गेली होती, जी लिलाव शुल्कानंतर २.६३ कोटी झाली.

पुणे : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभूत झालेले पुण्यातील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील (SP Group) दोन माजी आमदार ...
३० नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांनी इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तर शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्धच १४ ऑगस्ट १९४८ रोजी खेळला. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दित ५२ कसोटी सामने खेळले आणि ८० डावात त्यांनी एकूण ६९९६ धावा केल्या. यात ३३४ ही त्यांची सर्वोत्तम खेळी राहिली. त्यांनी २९ शतकं आणि १३ अर्धशतकं ठोकली. यात १२ द्विशतकं आणि तीन त्रिशतकांचा समावेश आहे. क्रिकेट इतिहासात एका फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावांची सरासरी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा कधी विक्रमांची चर्चा होत असते, तेव्हा डॉन ब्रॅडमन हे नाव चर्चेत येतेच. ब्रॅडमन यांचं २००१ मध्ये निधन झालं. तेव्हा त्यांचं वय ९२ वर्षे होतं. सर डॉन ब्रॅडमन यांचं निधन होऊन २४ वर्षे लोटली आहेत.त्यांनतर आज पुन्हा सर डॉन ब्रॅडमन त्यांच्या ‘बॅगी ग्रीन कॅप’चा लीलाव या कारणामुळे चर्चेत आलं आहे.
रिपोर्टनुसार, ही कॅप ब्रॅडमन यांनी भारतीय टूर मॅनेजर पंकज “पीटर” कुमार गुप्ता यांना भेट दिली होती. लिलाव फक्त १० मिनिटे चालला, परंतु संग्राहकांनी हा मौल्यवान वारसा खरेदी करण्यासाठी जोरदार बोली लावली. जेव्हा अंतिम बोली लावली गेली, तेव्हा कॅपला $३९०,०० म्हणजेच २.६३ कोटी मिळाले, ज्यामुळे ते आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्वात महागड्या क्रिकेट स्मृती चिन्हांपैकी एक बनले आहे.