Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीMNS beats Marwari : मराठी महिलेवर अरेरावी करणाऱ्या मारवाडी दुकानदाराला मनसैनिकांनी चोपलं

MNS beats Marwari : मराठी महिलेवर अरेरावी करणाऱ्या मारवाडी दुकानदाराला मनसैनिकांनी चोपलं

मुंबई : मुंबईमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे आता मराठी बोलायचं नाही, मारवाडीतच बोलायचं असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. या दुकानदाराने मराठीत बोलणाऱ्या महिलेवर मारवाडीत बोलण्याची जबरदस्ती केली होती. गिरगावातील खेतवाडीमध्ये ही घटना घडली असून मनसैनिकांनी चोपल्यानंतर त्या दुकानदाराने मराठी माणसांची माफी मागितली आहे. या संबंधित व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

एक मराठी महिला खेतवाडीमध्ये दुकानात गेली असताना त्या दुकानदाराने तिला मराठीत का बोलली म्हणून जाब विचारला. आता महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, असं सांगत त्याने महिलेला मारवाडीमध्ये बोलण्यास सांगितलं. ‘बीजेपी आया है, मारवाडी में बात करनेका. मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का’ असं त्या दुकानदाराने त्या महिलेला म्हटलं.

Indi alliance : अदानीच्या मुद्दयावरून इंडि आघाडीत मतभेद

मनसेकडून चोप  

त्या महिलेने खेतवाडी मनसे कार्यालयात याची तक्रार केली. तक्रार मिळतात मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला बोलावून घेतलं आणि जाब विचारला. त्यावर आपण त्या महिलेला मारवाडीत बोलायला सांगितल्याचं दुकानदाराने मान्य केलं. त्यानंतर मनसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. मनसैनिकांनी चोप देताच त्या दुकानदाराने आपली चूक मान्य केली आणि मराठी माणसाची माफी मागितली. पुन्हा आपल्याकडून असं होणार नाही अशी ग्वाहीही दुकानदाराने दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -