Imran Khan : इम्रान खान आणि पत्नी बुशरा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

लाहोर : पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान, (Imran Khan) त्यांची पत्नी बुशरा बीबी, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि इतर ९३ जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इस्लामाबादमध्ये येथे गेल्या आठवड्यात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थकांनी निदर्शने केली होती.


निदर्शनांदरम्यान हिंसाचार, दंगल आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपांना उत्तर म्हणून हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. गेल्या २४ नोव्हेंबर रोजी देशव्यापी निदर्शनासाठी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान यांनी 'करो किंवा मरो'चा नारा दिला होता.



२०२३ पासून तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी १३ नोव्हेंबर रोजी २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी निषेधाची अंतिम घोषणा केली होती.यावेळी पार्टीच्या समर्थकांनी इम्रान खान आणि इतर नेत्यांची तुरुंगातून सुटका, आठ फेब्रुवारीच्या निवडणुकीत पीटीआयच्या विजयाची मान्यता आणि २६ वी घटनादुरुस्ती रद्द करण्याची मागणी केली होती.


दरम्यान, २६ व्या घटनादुरुस्तीने न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलली आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, इस्लामाबादमधील मुख्य निदर्शने हाणामारीत संपली. यामध्ये १२ पीटीआई समर्थकांचा मृत्यू झाला. तर शेकडो जणांना अटक करण्यात आली आहे इस्लामाबाद पोलिसांनी ९६ संशयितांची यादी राजधानी स्थित दहशतवाद विरोधी न्यायालयाला सादर केली, ज्यात पक्षाचे प्रमुख नेते इम्रान खान, बुशरा बीबी, अली अमीन गंडापूर, माजी अध्यक्ष आरिफ अल्वी, नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष असद कैसर, पक्षाचे अध्यक्ष गौहर खान, नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते उमर अयुब खान आणि इतर अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश होता.


इस्लामाबाद पोलिसांनी या सर्वांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याची विनंती न्यायालयाला केली होती आणि एटीसी न्यायाधीश ताहिर अब्बास सिप्रा यांनी त्यांची विनंती मान्य केली. निदर्शनांनंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मध्ये पाकिस्तान दंड संहिता, दहशतवादविरोधी कायदा आणि शांततापूर्ण असेंब्ली आणि सार्वजनिक सुव्यवस्था कायद्याच्या विविध कलमांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल

काँगोत भीषण दुर्घटना ! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

दक्षिण आफ्रिका  : देश काँगोत पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या