तामिळनाडू: शनिवार पासून चेन्नईजवळ धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्याची दुर्दशा केली. सोसाट्याचा वारा आणि जोरदार सरींसोबत फेंगल वादळामुळे तामिळनाडूतील लोक त्रस्त झाली आहेत. घरांसोबत ,गाड्यांचेही नुकसान झाले आहे.
Mumbai: मुंबई हादरली! आजोबांनीच केले १३ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार
या अवकाळी पावसाने तिरुवन्नमलाई येथील एका टेकडीवरून भूस्खलन झाले. माती, दगडांचे ढिगारेच्या ढिगारे कोसळले. याच दरम्यान ४० टन वजनाचा दगड खाली आला आणि व्हीयूसी नगर च्या रस्त्यावर असलेल्या घरांवर पडला. त्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ह्यात ५ लहान मुलांचा समावेश असल्याचे कळते आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असून ४ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.तामिळनाडूचे उपमुखमंत्री उदयनीधी स्टॅलीन यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.