मुंबई: मुंबईच्या मुलुंड परिसरात हिट अँड रन प्रकरण(Hit and Run) घडले आहे. या अपघातात एक महिला ट्रकच्या धडकेत ठार झाली आहे. दरम्यान, ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुलुंड पश्चिम भागातील एटीगेटेड कमल सोसायटीत मृत महिला राहत होती. ही महिला आपले पती विशाल पुनिमिया आणि मुलीसोहच शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास टू व्हीलरवरून तांबेनगर परिसरात जात होते. यावेळेस मुलुंड-गोरेगाव लिंक परिसरात मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने विशाल यांच्या बाईकला धडक दिली. यावेळेस विशाल यांची पत्नी ट्रकच्या चाकाखाली आली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर ट्रकचालक तेथून फरार झाला. या फरार झालेल्या ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.