Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजठाणेमहत्वाची बातमी

Shrikant Shinde : सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या

Shrikant Shinde : सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या

'टेबल न्यूज' करणाऱ्या पत्रकारांची खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली बोलती बंद


ठाणे : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कुठल्या पदावर जाणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळापासून सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड यश मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र आता उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे राहणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. अखेर श्रीकांत शिंदे यांनीच या बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ते सांभाळणार का? केंद्रात राहणार की राज्यात? केंद्रात मंत्रीपद त्यांना मिळणार का? यावर श्रीकांत शिंदे यांच्याकडून आलेल्या स्पष्टीकरणामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.



काय म्हणाले श्रीकांत शिंदे


श्रीकांत शिंदे यांनी X वर ट्विट करत म्हटले आहे की, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी होते. त्यांनी त्या ठिकाणी विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. तसेच मी उपमुख्यमंत्री होणार? अशा बातम्या गेली दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असे स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. श्रीकांत शिंदे यांच्याकडून आलेल्या स्पष्टीकरणामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.





केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी


लोकसभा निवणुकीनंतर झालेल्या मंत्रिपदाच्या विस्ताराबद्दल बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.



दरम्यान, महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी नवीन सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. परंतु या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा, मुख्यमंत्रिपदाचे सूत्र, नेतृत्वाची रचना याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.


Comments
Add Comment