मुंबई : एस टी महामंडळ दाखल झालेल्या वातानुकूलित शिवशाही (Shivshahi) बस सुविधांपेक्षा अपघातांमुळे जास्त चर्चेत राहिली आहेत. साडेसहा वर्षांपूर्वी महामंडळाच्या तापत झालेल्या शिवशाहीचे अपघातांचे सत्र थांबलेले नाही मात्र सध्या शिवशाही बसची संख्या ही ७९२ असून त्या बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आज एसटी महामंडळाने स्पष्ट केले .
एस टी महामंडळाने जून२०१७ मध्ये शिवशाही या वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या होत्या यात स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता मात्र शिवशाही बसचे अपघातांचे प्रमाण पाहता व त्या बस गाड्यांची सध्याची अवस्था पाहता या बस गाड्या बंद करण्यासंबंधी चर्चा सुरू होत्या. मात्र सध्या एकूण ७९२ शिवशाही बसेस एसटीकडे असून सध्या ४५० बस सेवेत आहेत . त्या बसगाड्यांमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसल्याने सध्या शिवशाही बस बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे आज एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले .
ISRO Proba-3 : सूर्याची रहस्ये उलगडण्यासाठी ‘मोहीम प्रोबा-३’साठी इस्रो सज्ज!
एसटी महामंडळाने राबवलेल्या विविध उपायोजनांमुळे शिवशाहीच्या अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटले असले तरी त्याला अजूनही पूर्णपणे आळा बसलेला नाही काही दोन दिवसापूर्वीच वर्धा येथे शिवशाही बस उलटून १४ जण मृत्यूमुखी पडले होते त्यामुळे एस टी महामंडळातील शिवशाही बस आता कायमस्वरूपी बंद होणार व त्याचे साध्या बस मध्ये रूपांतर होणार ही चर्चा होती मात्र एसटी महामंडळांने पूर्णपणे फेटाळून लावली असून या बस यापुढेही प्रवाशांसाठी सुरु राहतील असे स्पष्ट केले .