Friday, June 13, 2025

Share Market: डिसेंबर महिन्यात शेअर बाजार १० दिवस राहणार बंद

Share Market: डिसेंबर महिन्यात शेअर बाजार १० दिवस राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये(Share Market) ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात तब्बल १० दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी २१ दिवस मिळणार आहेत.



या आहेत डिसेंबरच्या सुट्टया


शेअर बाजारात डिसेंबर महिन्यात १० दिवस सुट्ट्या आहेत. या महिन्याच्या प्रत्येक शनिवारी म्हणजेच महिन्याचे चार शनिवार आणि पाच रविवार शेअर बाजार बंद असणार आहे. त्यामुळे या दिवशी बाजाराचे व्यवहार बंद असतील. त्यासोबतच २५ डिसेंबरला नाताळची सुट्टी असणार आहे. त्यामुळे नाताळनिमित्त शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतील.


वर्षाचा शेवटचा महिना गुतंवणूकदारांसाठी आर्थिक बाजूच्या तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकिनातून अतिशय महत्वाचा मनाला जातो. मात्र या महिन्यात १० सुट्ट्या आल्याने शेअर बाजारातील व्यवहार कमी होणार आहेत.


Comments
Add Comment