मुंबई: हल्ली अनेकांच्या शरीरात व्हिटामिन डीची कमतरता आढळते. दोनपैकी एका व्यक्तीला व्हिटामिन डीचा कमतरता सतावत असते. खासकरून थंडीच्या दिवसांत व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीराचा त्रास वाढतो. यामुळे व्हिटामिन डीने परिपूर्ण खाद्य पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.
शरीरासाठी सर्व व्हिटामिन्स, मिनरल्स आणि दुसरी पोषकतत्वे गरजेची आहेत. असेच गरजेचे पोषकतत्व आहे ते म्हणजे व्हिटामिन डी. व्हिटामिन डीची कमतरता असल्यास शरीरात कॅल्शियम आणि आर्यनही कमी होऊ लागते. यामुळे शरीरावर परिणाम होतो. इम्युनिटी कमकुवत होते. थंडीच्या दिवसांत व्हिटामिन डीची कमतरता असल्यास आजारांपासून लढण्याची क्षमताही कमी होते.
या पदार्थांमध्ये असते व्हिटामिन डी
संत्रे – थंडीच्या दिवसांत अनेक जण संत्री खाण्यापासून बचाव करतात. संत्र्यामध्ये व्हिटामिन डी, व्हिटामिन सी आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही संत्रे खाऊ शकता अथवा संत्र्याचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे शरीरातील व्हिटामिन डी आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
सीफूड– व्हिटामिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये सीफूडचा समावेश केला पाहिजे. माशांमध्ये तुम्ही सॅलमन, ट्युना, मॅकरेल हे मासे खाऊ शकता. यात व्हिटामिन डी आणि हेल्दी फॅट असते.
दूध – दूध आणि डेअरी उत्पादनांमध्ये व्हिटामिन डी मोठ्या प्रमाणात मिळते. खासकरून गाईच्या दुधातून शरीराला व्हिटामिन डी मिळते. दुधामध्ये व्हिटामिन डी शिवाय कॅल्शियम आणि दुसरी पोषकतत्वे मिळतात.
मशरूम – व्हिटामिन डीचा कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये मशरूमचा वापर करू शकता. मशरूमला व्हिटामिन डीचा चांगला स्त्रोत मानले जाते.