पिंपरी : केंद्र सरकारच्या (Central Government) पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंटने जारी केलेल्या नियमानुसार प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास बंदी (Plastic Ban) घातली आहे. आरोग्याला घातक तसेच पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर काही वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र अजूनही कित्येक जण प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरताना दिसून येतात. त्यामुळे आता पालिका प्रशासन पुन्हा अॅक्शन मोडवर आली आहे.
Railway Update : प्रवाशांना दिलासा! महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने ‘महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्मोकोल अविघटनशील वस्तूंच्या (उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचना, २०१८’ संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी करण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री व खरेदी होत आहे. त्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त सिंह यांनी दिला आहे.