Share

कथा – प्रा. देवबा पाटील

एके दिवशी जयश्रीकडे पाहुणे आले. ते रात्रभर मुक्कामी राहिले व दुस­ऱ्या दिवशी सकाळी निघून गेले; परंतु ते रात्री झोपेत घोरत होते.

“आई, झोपेत काही माणसे कशी काय घोरतात गं?” जयश्रीने दुस­ऱ्या दिवशी आईला विचारले.
“घोरणे ही अनैच्छिक क्रिया आहे. मनुष्य हा नेहमी नाकाने श्वासोच्छवास करीत असतो. त्यावेळी टाळूची त्वचा ही जीभेच्या वरच्या भागाला टेकलेली असते. त्यामुळे ती फडफडत नाही. काहीजण झोपल्यानंतर त्यांच्या नाकातील पोकळीचे स्नायू शिथिल होतात, त्यामुळे ती पोकळी खूप अरुंद होते, कधी-कधी बंदही होते. अशा वेळी नाकावाटे पूर्णपणे हवा आत घेतली जात नाही व त्या व्यक्तीचे तोंड आपोआप उघडते व तोंडाने श्वासोच्छवास सुरू होतो. तोंड उघडे पडल्यामुळे व श्वासनलिकेच्या मर्यादेपेक्षा जास्त हवा तोंडाने आत घेतल्यामुळे टाळूची कातडी सैल पडते. हवेच्या आतबाहेर जाण्यायेण्यामुळे ती फडफडते व कंप पावते. त्यासोबत पडजीभसुद्धा थरथरते. टाळूच्या फडफडण्याने व पडजीभेच्या थरथरण्याने जो आवाज निर्माण होतो त्यालाच घोरणे असे म्हणतात. यावर उत्तम उपाय म्हणजे उपडे पोट जमीनीला टेकून झोपणे हा आहे.” आईने सांगितले.

“पण मग जागे असताना का नाही घोरत माणसं?” जयश्रीने शंका उकरली.
“जागेपणी टाळू घट्ट असते, तिच्यात सैलपणा नसतो. त्यामुळे ती फडफडत नाही. म्हणून जागेपणी माणूस घोरत नसतो.” आईने उत्तर दिले.

“बाबा, काही जणांचे दात झोपेत करकर का वाजतात हो” जयश्रीने प्रश्न केला.
“झोपेत दात चावण्याची ब­ऱ्याच जणांना सवय असते. त्यालाच दात खाणे असेही म्हणतात. कधीकधी झोपेत काही विशिष्ट कारणाने खालच्या जबड्याचे काही स्नायू सतत अगदी थोडे थोडे आकुंचन व प्रसरण पावत असतात व त्यामुळे तो जबडाही सतत हालत राहतो. त्यामुळे त्या जबड्याची एका विशिष्ट त­ऱ्हेने हालचाल होत असते. त्यामुळे खालच्या जबड्यातील दात वरच्या दातांवर एका बाजूकडून दुस­ऱ्या बाजूकडे सतत घासले जातात. त्यामुळे दात खाल्ल्याचा आवाज होतो. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणावर त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष ताबा नसतो. ती हालचाल जवळजवळ आपोआपच होत असते. ती नियंत्रित करण्याचे केंद्र मेंदूत असते. दात खाण्याचे कारणे म्हणजे त्या व्यक्तीला काही कारणास्तव शांत झोप न लागणे, कधीकधी शारीरिक व मानसिक स्थिती ठीक नसणे अशी आहेत. त्यामुळेच त्या व्यक्तीचे दात ब­ऱ्याचदा झोपेत करकर वाजतात.” बाबांनी सांगितले.

“बाबा, तुम्हाला कसे हो हे एवढे माहीत? तुम्ही तर रोज शेतात कामाला जाता.” जयश्रीने विचारले. “अगं ताई, मीसुद्धा फावल्यावेळी तुझ्या आईने आणलेली पुस्तके वाचत असतो. म्हणून मलाही काही गोष्टी माहीत झाल्यात. तुझ्या आईजवळ प्रा. देवबा पाटील या लेखकांचे “अनैच्छिक प्रतिक्षिप्त क्रिया” हे अतिशय सुरेख व सहजगम्य असे पुस्तक आहे. त्या पुस्तकात ही सारी माहिती छानपणे समजावून सांगितली आहे. आईने व मी ते पुस्तक ब­ऱ्याचदा वाचले व त्यावर आम्ही दोघांनी मिळून खूपदा चर्चाही केली आहे.” तिचे बाबा म्हणाले.

“ असे आहे का. मलासुद्धा ते पुस्तक वाचायला द्याल बरं.” जयश्री म्हणाली.
“ हो बाळा, आईने ते पुस्तक कपाटात व्यवस्थित ठेवलेले आहे. उद्या ती काढून तुला ते पुस्तक जरूर देईल. तू लक्षपूर्वक ते पुस्तक वाचून घे. तुला खूप कामी पडेल ते ज्ञानवर्धक पुस्तक.” बाबा म्हणाले.

Tags: Snoring

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

30 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

1 hour ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

1 hour ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

1 hour ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago