Saturday, February 15, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात काँग्रेसला धक्का, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला धक्का, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाणे : ठाणे कळवा पूर्व घोलई नगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी व असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज भाजप मध्ये प्रवेश केला, ठाणे काँग्रेसला आता गळती लागली आहे, ह्या अगोदर काँग्रेसचे मनोज शिंदे हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले, तर आज जगदीश गौरी भाजप वाशी झाले,

आज सकाळी ११ वाजता आपल्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांसह वर्तक नगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले, भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तळवडेकर यांच्या पुढाकाराने आणो भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा पक्ष प्रवेश झाला, काँग्रेस मध्ये असताना आमची कुठलीही काम होत नव्हती, काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जगदीश गौरी यांनी सांगितले.

त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर सामाजिक न्याय विभाग ठाणे शहर सचिव संदीप सूर्यवंशी, सुशांत धुळप, वार्ड अध्यक्ष संतोष झिमल, काँग्रेस कार्यकर्ते भरत पाटील, मंगेश तळेगावकर, विजय कासार, पुजारी यादव, रवी Army नितेश सूर्यवंशी महेश सूर्यवंशी व महिला कार्यकर्त्यां सहभागी होत्या, तर भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी कार्यकारणी सदस्य अरविंद कलवार, प्रभाग सदस्य गजानन परब, भाजप कामगार मोर्चा सचिव प्रशांत तळवडेकर, उत्तर भारती मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत यादव, दिव्यांग सेल सचिव आमिन मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षला ताई बुबेरा कळवा मंडळ अध्यक्ष भूषण म्हात्रे, कळवा मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नरेश गायकवाड उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -