Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडी'ईव्हीएमवर विश्वास नसेल तर राहुल यांनी राजीनामा द्यावा'

‘ईव्हीएमवर विश्वास नसेल तर राहुल यांनी राजीनामा द्यावा’

नवी दिल्ली: ईव्हीएमवर विश्वास नसेल तर राहुल गांधींनी राजीनामा द्यावा आणि मतपत्रिका परत आल्यावरच निवडणूक लढावी असा टोला भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी लगावला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर भाजपने जोरदार टीका केली आहे. याला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी आधी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपर परत आल्यानंतरच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करावे. त्यांनी असे केले तर कदाचित त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. अन्यथा हे आरोप केवळ पोकळ शब्दच राहतील.

ईव्हीएम आधारित निवडणूक प्रक्रियेतून निवडून येऊन ते खासदारही झाले आहेत, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावे असे भाटिया यांनी सांगितले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर काँग्रेसने न्यायालयात जावे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हता अधोरेखीत केली आहे. प्रियंका गांधी यांनी लोकसभा खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. ही मोठी विडंबना असून काँग्रेस लवकरच इतिहासजमा होणार असल्याचे भाटिया यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -