सोलापूर : लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचतगटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शनचे नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत. ही रक्कम महिलांचे अर्थकारण सक्षम करण्याची उत्तम संधी असू शकते.
लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेचे काय करायचे असा प्रश्न महिलांसमोर आहे. आर्थिक साक्षरतेअभावी या रकमेच्या वापरातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण न होता ही रक्कम घरखर्चात वापरली जात आहे. प्रत्यक्षात या रकमेतून कर्जाची पत मिळून एखादा व्यवसाय उभा राहू शकतो.सआयपीमध्ये महिलांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. कारण ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.
या गुंतवणुकीत वार्षिक परतावा (एसडब्ल्यूपी- सिस्टमॅटीक विथड्रॉल प्लान) आयुष्यभरासाठी मिळवता येतो.तसेच गुंतवलेल्या रकमेची मार्केट व्हॅल्यू देखील वाढत जाते. विशेष म्हणजे हे मासिक मानधनात १५०० रुपयांची भर घालून जर ३ हजार रुपये करून सीपमध्ये गुंतवले तर महिन्याला १२०० रुपये आयुष्यभरासाठी मिळतात. म्हणजे लाडकी बहिण योजनेएवढी मासिक रक्कम स्वतःच्या गुंतवणुकीवर मिळू शकते.