Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीST Bus Ticket Price Hike : लालपरीचा प्रवास महागणार! तिकीट दरात वाढ...

ST Bus Ticket Price Hike : लालपरीचा प्रवास महागणार! तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यभरात सातत्याने महागाई वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोनं-चांदी, भाजीपाला, फळे, साबण, खाद्य तेल अशा कित्येक गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. अशातच सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी मोठी पसंती असणाऱ्या लालपरीचा प्रवासही (ST Bus Ticket Price Hike) महागणार आहे.

LPG Price : एलपीजी सिलेंडर झाला महाग…महिन्याच्या १ तारखेला झटका

मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. त्यामुळे आता एसटी प्रवासाच्या तिकीट दरात १०० रुपयांमागे १५ रुपये तिकीट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, याआधी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीट दरवाढ झाली होती. त्यानंतर आता तिकीट दरवाढ होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (ST Bus Ticket Price Hike)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -