मुंबई: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध(IND vs AUS) पर्थ कसोटीत २९५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमध्ये हा सर्वात मोठा विजय होता. या जबरदस्त विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. आता दोन्ही संघादरम्यानचा दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला ओव्हलमध्ये खेळवला जाईल. हा कसोटी सामना पिंक बॉलने खेळवला जाईल यासाठी दोन्ही संघ तयारी करत आहेत.
ऑस्ट्रेलियन संघात २ नव्या खेळाडूंची एंट्री, हेझलवूड बाहेर
दरम्यान, दुसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे अॅडलेड कसोटीतून बाहेर झाला आहे. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी शानदार प्रदर्शन केले होते. त्यांने पहिल्या डावात २९ धावा देत ४ विकेट घेतल्या होत्या. यामुळे भारत १५० धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात १ विकेट मिळवला होता.
जोश हेझलवूडच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन अनकॅप्ड वेगवान गोलंदाज सीन एबॉट आणि ब्रेंड डोगेटच्या अॅडलेड कसोटी सामन्यासाठी संघात सामील केले आहे. डॉगेट आणि सीन एबॉटने आतापर्यंत कसोटीत पदार्पण केलेले नाही. एबॉटने ऑस्ट्रेलियासाठी २६ वनडे आणि २० टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. याच्या नावावर एकूण ५५ विकेट आहेत.