आई, अगं बघ ना, नाही जमत आहे मला साडीची घडी तुझ्यासारखी नीट…
दहावीच्या फेअरवेलसाठी आईच्या नवीन साडीची घडी तिने आज मोडली होती, आईने कुंकू लाऊन तिच्या हाती दिली नेसायला कौतुकाने! आईचं कपाट म्हणजे परफेक्शन… सर्व कपडे नीट, एकावर एक घडी करून ठेवलेले… ना इकडे ना तिकडे… साड्यांच्या घड्यांवरून आपुलकीचा हात फिरत असतो तिचा अधूनमधून!
लग्नातल्या पैठणीच्या घडीतून येणारा अत्तराचा सुगंध दरवळत जातो आतपर्यंत हृदयात… तिच्याच व जुन्या आठवणी सुगंधित होऊन तरंगत राहतात मनाच्या हिंदोळ्यावर!
तव्यावरची तिच्या हातची घडीची मऊसूत पोळी खाण्याचे सुख काही वेगळंच… आणि सणासुदीला चिरोट्याचे एक एक पापुद्रा उलगडत जातो जेव्हा घड्यांवर घड्या घालून लाटलेले… खुसखुशीत… घड्यांचेच कसब हे!
शाळेत जाताना परीटघडीचा गणवेश रुबाब वाढवतो, आत्मविश्वासही वाढल्यासारखा भासतो… कॉलर कडक!!
गणवेशावरून आठवलं, शाळेत एकदा पेपरच्या अनेक प्रकारे घड्या करून सुंदर कलाकृती बनवणे, ज्याला जॅपनीज ऍरोगामी असं म्हणतात, ते शिकवले जात, नुसत्या घड्यांमधून साकार होऊ शकतं अशी ही कला… वर्गात शिकवताना
शिक्षकांचा नेहमीचा फंडा… ‘हाताची घडी तोंडावर बोट’!!
पोरवयात मैत्रिणींची घडीभर सोबत सुद्धा बरंच काही देऊन जाते…
स्वप्नाळू वय हळुवार गुणगुणतं… ‘घडी घडी मेरा दिल धडके…’
प्रेमात जवळीक वाढते तेव्हा… ‘दो घडी वो जो पास आ बैठे.’
संसाराची स्वप्न साकार होऊ लागतात तेव्हा…
‘जीवनात ही घडी अशीच राहू दे…’
ती हल्ली दमते कामानं…
घडीभर विश्रांती हवी असते तिला… पण घर आवरणं, वाचून घरभर पसरलेलं वर्तमानपत्र घडी करून जागेवर ठेवलंच पाहिजे… ही स्वतःचीच शिस्त!
थकलेल्या आयुष्याला घडीभर कोणाशी तरी बोलावेसे वाटते… मन मोकळे करावेसे वाटते…
पण…
जमाना बदल रहा है…
जब घडी किसी के पास नही थी,
वक्त सबके पास था…
आज घडी सबके पास है,
पर वक्त किसी के पास नही…!!
घडीभराचं आयुष्य हे!
घडीभर जगून घेऊ आनंदाने!!
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…