Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीलातूरमध्ये कुंटणखाना चालवणारी महिला अटकेत, दोन पीडित महिलांची सुटका

लातूरमध्ये कुंटणखाना चालवणारी महिला अटकेत, दोन पीडित महिलांची सुटका

लातूर : लातूर शहरातील बार्शी रोड परिसरामध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन ‘डायमंड स्पा’च्या नावाखाली त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कुंटणखाना चालवणा-या महिलेला अटक केली असून दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

सदर माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर यांच्या नेतृत्वात एएचटीयु पथकाने बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून ती खरी असल्याचे निदर्शनास येताच लातूर शहरातील बार्शी रोड परिसरातील “डायमंड स्पा” वर छापा मारला. त्याठिकाणी देहविक्री करीत असताना दोन पिडीत महिला व कुंटणखाना चालवणारी एक महिला आढळून आली.

Gram Sabha Decision : शिवी दिल्यास ५०० रुपये दंड

पिडीत महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारे, स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरगावच्या महिलांना स्वतःचे स्पा मध्ये ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतात व आम्हाला काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात असे पीडित महिलांनी सांगितले.

सदर प्रकाराबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

सदर कारवाईत पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर, पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, हवालदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला हवालदार सुधामती यादव आणि निहाल मनियार यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर देडे करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -