Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीVegetables : थंडीमुळे भाज्यांचे दर चांगलेच कडाडले

Vegetables : थंडीमुळे भाज्यांचे दर चांगलेच कडाडले

वातावरण थंड असल्यामुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्याने आवक घटली

नवी मुंबई : यंदा पाऊस थांबल्यानंतर पुन्हा भाज्यांच्या पिकाची लागवड करण्यात आली. परंतु सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण भाज्यांच्या वाढीस पूरक नसल्यामुळे भाजी काढणीसाठी तयार होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे बाजारात काही भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यांतून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे ५५० ते ६०० भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. गेले काही दिवसांपासून बाजार समितीत दुधी भोपळा, गवार, कोबी, दोडका, वांगी, शेवगा या भाज्यांची आवक घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या दरात १० ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही या भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Gram Sabha Decision : शिवी दिल्यास ५०० रुपये दंड

सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. हे वातावरण काही भाज्यांच्या वाढीसाठी पूरक नसल्यामुळे या भाज्यांची वाढ होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन घटल्याची माहिती नवी मुंबईचे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी दिली. तसेच सध्या मोठ्या प्रमाणात शेतमाल हा स्थानिक बाजारात विक्री केला जात आहे. त्यामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारचे उपसचिव मारुती पबितवार यांनी दिली. तसेच सध्या मोठ्या प्रमाणात शेतमाल हा स्थानिक बाजारात विक्री केला जात आहे. त्यामुळे बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारचे उपसचिव मारुती पबितवार यांनी दिली.

भारतात लसणाचे पीक झाले नसून इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशांतून लसणाची आयात केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लसणाची साठवण कमी आहे. मागील वर्षी १० ते २० प्रतिकिलो रुपयांनी बाजार भावाने लसूण विक्री केला जात होता. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लसणाचे पीक घेतले नसल्याने भारतात लसणाची आवक घटली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अडीच ते तीन हजार नग लसूण येत आहे. घाऊकात २०० ते ३०० प्रति किलो रुपयांनी लसूण विकला जात आहे. १५ जानेवारीनंतर मध्य प्रदेश येथून लसूण आयात होईल. त्यानंतर लसणाचे दर कमी होतील, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा – बटाटा बाजार विभागातील साहाय्यक सचिव बाळासाहेब टावरे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -