मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबरला पार पडली. यानंतर विरोधी पक्षातील बहुतांशी उमेदवारांनी ईव्हएमवर शंका उपस्थित केली. त्यानंतर अनेक उमेदवारांनी आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती. या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) उत्तर दिले आहे.
महाराष्ट्र निवडणूक मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपांवर चर्चा करण्यासाठी आयोगाने ३ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. सर्व कायदेशीर शंकांचे निरसन करणार असून विधानसभा निवडणूक ही पारदर्शक झाली आहे.
निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार/त्यांच्या एजंटांच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. राजकीय पक्षांच्या सहभागासह पारदर्शक मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया केली आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येक उमेदवाराचे लेखी ऐकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सर्व समस्यांचे कायदेशीररित्या पूर्तता करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिले आहे.