
मुंबई : निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्यातून तो त्याचा नवनवीन प्रोजेक्ट्स बद्दल माहिती देत असतो नुकतंच त्याने सोशल मीडिया वर त्यांचा फॅन्स सोबत (Ask Me Anything) सेशन केल यात प्रेक्षकांनी अनेक प्रश्न विचारले पण यातल्या एका प्रश्नाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतल. एका फॅन ने स्वप्नील ला मुंबई पुणे मुंबई ४ येणार का ? असा प्रश्न विचारल्यावर स्वप्नील ने उत्तर देताना चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शकांना म्हणजे सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिला यात टॅग करून नेवर से नेवर (Never Say Never) असं लिहिलं! आता यातून स्वप्नील नेमकं काय म्हणतोय हे गुलदस्त्याच आहे!

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित मुंबई: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2024) ...
या इंस्टाग्राम स्टोरी नंतर मुंबई पुणे मुंबई ४ नक्की येणार का? स्वप्नील आणि मुक्ता ची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अश्या अनेक प्रश्नांना उधाण आल आहे. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ घर निर्माण केलं आहे यात शंका नाही.

सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत असून येणाऱ्या वर्षात अनेक विविध भूमिका साकारणार आहे. २०२४ वर्ष त्याने वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स ने गाजवल आहे आणि येणाऱ्या काळात देखील तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.