मुंबई: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील संघर्षामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy) स्पर्धेबाबत साशंकता आहे. एकीकडे बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही आहे तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही स्पष्ट केले आहे की त्यांना संपूर्ण स्पर्धेचे आयोदन पाकिस्तानात करायचे आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास तयार नाही. यातच २९ नोव्हेंबरला आज आयसीसीने बैठक बोलावली आहे.
ही व्हर्चुअल मीटिंग असून यात आयसीसी सर्व १२ सदस्य आणि २ सहसदस्य सामील होतील. तर आयसीसीचे चेअरमन मिळून वोटिंग मेबर्सची संख्या १६ होते. या बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
हायब्रिड मॉडेल
पीसीबी जरी हायब्रिड मॉडेलचा स्वीकार करत नसले तरी गेल्या काही दिवसांपासून हायब्रिड मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे. जर हायब्रिड मॉडेल लागू झाले तर भारताचे सामने यूएईला शिफ्ट कऱण्याची शक्यता आहे. हायब्रिड मॉडेल वापरले जाण्याची शक्यता अधिक कारण पीसीबीला चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन सोडायचे नाही तर भारताला सुरक्षा व्यवस्थेची काळजी आहे. अद्याप काही स्पष्ट नाही आहे.
संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानाबाहेर
पाकिस्तान कोणत्याही परिस्थिती हायब्रि़ड मॉ़डेलचा स्वीकार करत नसेल तर जबरदस्ती आयसीसीला पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन काढून घ्यावे लागेल. अशातच संपूर्ण स्पर्धा ही पाकिस्तानच्या बाहेर शिफ्ट केली जाऊ शकते. काही मिडिया रिपोर्ट्सनुसार अशी परिस्थिती आल्यास श्रीलंकेकडे यजमानपद दिले जाऊ शकते.
पाकिस्तान व्हावा भारत-पाक सामना
पाकिस्तानकडून मागणी केली जाऊ शकते की भारत-पाकिस्तान सामना असेल तर तो पाकिस्तानात खेळवला जावा. याशिवाय पीसीबीकडून हीदेखील मागणी होऊ शकते की फायनलचा सामनाही पाकिस्तानात खेळला जावा. दरम्यान, भारतीय संघाने बॉर्डर पार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे हा पर्याय रद्द होऊ शकतो.