मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये घडामोडींना वेग आला असतानाच महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचे मूळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीमधील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री कोण आणि सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही. या बैठकीत सरकार स्थापने संदर्भात शाह यांनी सूचना दिल्या आहेत.
Urdu Bhavan : ‘उर्दू भाषा भवन’ ‘मातोश्री’मध्ये उभारण्याची भाजपा नेते आमदार नितेश राणे यांची मागणी
यानंतर आज एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांची मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. पण, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे.