Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Pune Crime : विकृतीचा कळस! चॉकलेटच्या बहाण्याने दोन मुलींवर शेजाऱ्यानेच केले अत्याचार

Pune Crime : विकृतीचा कळस! चॉकलेटच्या बहाण्याने दोन मुलींवर शेजाऱ्यानेच केले अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या स्मार्ट पुणे (Pune News) शहरात साततत्याने अपघात, अत्याचार, खून, चोरी अशा घटना घडल्याचे समोर येत आहे. अशातच आता पुण्यातन विकृतीचा कळस असणारी बातमी (Pune Crime) समोर आली आहे. एका ६० वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या चिमुकलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चॉकलेटच्या बहाण्याने नराधमाने दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय नराधमाने चॉकलेट खाण्याचे आमिष दाखवत त्यांना घरी नेले व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलींच्या आईला हा प्रकार समजताच त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या पोलिसांनी नराधमाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Pune Crime)

Comments
Add Comment