Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीShrikant Shinde : सत्ता आणि पद भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...

Shrikant Shinde : सत्ता आणि पद भल्याभल्यांना मोहात पाडते, पण…

वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची भावूक पोस्ट

मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ आता संपला आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी जनतेसाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या. मात्र अडीच वर्षाच्या कालावधीनंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाले नसले तरीही मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींकडून नाराजीचा सूर मारला जात आहे. तसेच त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी देखील वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Vinod Tawde : विनोद तावडे ‘गेमचेंजर’! अमित शाहांसोबत रात्रीच्या बैठकीत नेमकी कोणती खलबतं झाली?

काय आहे श्रीकांत शिंदेंची पोस्ट?

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे. सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!”, असे श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहले असून ही पोस्ट सोशल मीडियावे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -