Sunday, October 26, 2025
Happy Diwali

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो? घ्या जाणून

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो? घ्या जाणून

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) २०१४ या वर्षापासून देशाच्या सत्तेची कमान सांभाळत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनाही त्यांच्या कामासाठी दर महिन्याला पगार आणि भत्ते मिळतात. तुम्हाला माहीत आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो. घ्या जाणून...

लोकसभेतील प्रत्येक सदस्याला पगार आणि भत्ते ठरलेले असतात. मात्र जे खासदार पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री अथवा राज्य मंत्री बनतात त्यांना दर महिन्याला इतर खासदारांच्या तुलनेत वेगळा भत्ता मिळतो. पंतप्रधान आणि मंत्र्‍यांना दर महिन्याला सत्कार भत्ता मिळतो.

पंतप्रधानांना दर महिन्याला ३ हजार रूपये सत्कार भत्ता मिळतो. हा भत्ता खरंतर हॉस्पिटॅलिटीसाठी असतो आणि मंत्र्‍यांना भेटायला येणाऱ्या लोकांवर खर्च होतो. पंतप्रधानांना पगार आणि भत्ता मिळून दर महिन्याला एकूण २.३३ लाख रूपये मिळतात.

खासदार असो वा पंतप्रधान अथवा राष्ट्रपती वा उपराष्ट्रपती सर्वांना इनकम टॅक्स भरावा लागतो. दरम्यान, यांना केवळ पगारावर टॅक्स भरावा लागतो.

Comments
Add Comment