Sunday, May 11, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Bollywood : २०२४चे हे सिनेमे थिएटर्समध्ये फ्लॉप, मात्र ओटीटीवर ट्रेंड

Bollywood : २०२४चे हे सिनेमे थिएटर्समध्ये फ्लॉप, मात्र ओटीटीवर ट्रेंड

मुंबई: आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या(Bollywood) त्या सिनेमांबद्दल सांगणार आहोत. हे सिनेमे मोठ्या पडद्यावर रिलीज झाले मात्र त्यांना चांगलाच फटका बसला. मात्र जेव्हा हे सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले तेव्हा मात्र हे सिनेमे ट्रेंडमध्ये होते.



बडे मियां छोटे मियां


सगळ्यात आधी बोलायचे झाल्यास अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा सिनेमा बडे मियां छोटे मियां. हा सिनेमा ३५० कोटींना बनला होता. या सिनेमाने भारतात केवळ ६३ कोटींची कमाई केली. मात्र ओटीटीवर हा सिनेमा बरेच दिवस ट्रेंडिंगमध्ये होता.



युध्रा


सिद्धांत चतुर्वेदी आणि राघव जुयाल यांचा सिनेमा २०२४च्या फ्लॉप सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाने साधारण ११.२५ कोटींचा बिझनेस केला होता. मात्र जेव्हा निर्मात्यांनी सिनेमाचा प्राईम व्हिडिओ रिलीज केला तेव्हा लोकांनी याला मोठी पसंती दिली होती. इतकंच नव्हे तर हा सिनेमा ओटीटीवरही टॉप १०मध्ये राहिला होता.



खेल खेल में


अक्षय कुमार आणि तापसी पन्नू या स्टार्सनी सजलेला बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. या सिनेमाने साधारण ५० कोटींपर्यंत कमाई केली होती. मोठ्या पडद्यावर हा सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज झाली. अनेक दिवस हा सिनेमा ट्रेंडमध्ये होता.



योद्धा


सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा हा सिनेमा २०२४मधील फ्लॉप सिनेमांपैकी एक आहे. हा सिनेमा ५५ कोटींचा बजेटमध्ये बनला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम ३५ कोटींचे कलेक्शन केले होते. याचेही नाव टॉप १०मध्ये सामील होते.

Comments
Add Comment